भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळीगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें

aligan kanthakanthin | pade mithi sarvangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळीगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥ न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥ वचनासी वचन मिळे। रिघती डोळे डोळियांत ॥२॥ तुका म्हणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥