भजनी मालिका

भजने

या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं अपुलिया हिता ॥१॥ फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

या रे हरीदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें नामाचि आवडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥ पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥ राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥ वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥ गातां वाचितां चरित्रें याची । न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

याचि अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरिष्ठ तें ॥१॥ जेथें नाहीं होणें निमणें संसारा । काळाचा आडदरा अनोळख ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥१॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥ बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥ याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥ मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥ आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याचिलागीं तुमचा करितसें धांवा । रात्रंदिवस देवा आळवूनि ॥१॥ नेणें जप तप स्नान संध्या विधी । जड माझी बुध्दि प्रज्ञाहीन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा