भजनी मालिका
← भजनांकडे परत

या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या

ya vithobaparaten an daivat mhanati | te shabda nay-kavati kanin majhya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥ पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥ तोहि जरी म्हणेल अहं-ब्रह्मास । तरी न पहावी वास येहीं नयनीं ॥३॥ कोटि कोटी ब्रह्मांडें एक एक्या रोमीं । व्यापोनियां व्योमीं वर्ततसे ॥४॥ ऐसा माझा विठो सर्वां घटीं सम । न संडावें वर्म नामा म्हणे ॥५॥