भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें

yachiya adharen rahilon nishchint | thevuniyan chitta payin sukhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥१॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंकिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥ मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥ तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥