भजनी मालिका
← भजनांकडे परत

या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां

ya vaishnavachya mata | to nenaven deva daitan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥ तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥ कानाचे हे कान । झालें धरूनियां ध्यान ॥३॥ डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहाळा ॥४॥ तोही वश्य नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥