भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे

yachiya dhyanen hen charachar | avaghen tadakar maj bhase

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥ मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥ चंद्रसूर्य तारांगणे । सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥ निळा म्हणे जनीं वनीं । हाचि भरोनि राहिला ॥४॥