भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें

ya re nachun premanande | ramanamacheni chhanden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥ म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥