भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा

yacha ashray jhala amhan | ya purushottama vithathalacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥ गातां वाचितां चरित्रें याची । न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥ आपुला संकेत सिध्दी न्यावा । करणें देवा हेंचि सत्य ॥३॥ निळा म्हणे निष्ठा जाणें । तैसाचि करणें आदर त्या ॥४॥