भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें

yachiya chhanda jen pain lagalen | nirmulan kelen tyanche yenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥ बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥ हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पाहतसे ॥३॥ एका जनार्दनीं याचा छंद नाहीं बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥