भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिया रुपाचें चिंतन । करितां तनु मन वेधलें

yachiya rupachen chintan | karitan tanu man vedhalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचिया रुपाचें चिंतन । करितां तनु मन वेधलें ॥१॥ देहीं नुरता देहभाव । झालों स्वयमेव तेंचि रुप ॥२॥ नाईकती शब्दा श्रवण । दुजिया नयन न देखति ॥३॥ निळा म्हणे बावरी ऐसी । दिसें लोकांसी प्रीति वरी ॥४॥