भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचा तंव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड

yacha tanv hachi mola | dekhila dola udand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याचा तंव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड॥१॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसे ॥२॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥ अंगीं वसे चि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥ तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंतीं हरीनें ॥६॥