भजनी मालिका
← भजनांकडे परत

या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा

ya ho ya chala jaun sakala | pahon ha sohala aji vrundavanincha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥ वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥ध्रु.॥ उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥ निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥ कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झालें उदास ॥४॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥