भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते

kay majha pan hoil latika | bridavali lokan davili te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥ खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥ आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥ तुका म्हणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनींच ॥३॥