भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें

kay nyun ahe sanga | panduranga tumhampen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें ॥१॥ आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥ कैसी तुम्हां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥२॥ आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंच्या ॥३॥