भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव

kay nahin lavat jhaden | visare veden dehabhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥ जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांवें ॥ध्रु.॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥ तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥