भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥ कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरी । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया वांचूनि झालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख ॥१॥ वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥ मग तळमळ न करितें मन । झालें तें कारण कळों येतें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ म्हणविल्यासाठी कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म पाळी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम