भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें

kay pathavilen | sanga bhatuken viththalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥ आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥ फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥२॥ तुका म्हणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा॥३॥