भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज

kay navhe karitan tuj | atan rakhen majhi laj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥ मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥ त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥ तुका म्हणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥