भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं

kay punyarashi | gelya bheduni akashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥ तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥ तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥