भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा

karin dhanda pari avadati pay | priti sangon kay nenan deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥ नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचि ते वाणी गुण वदे ॥२॥ मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥ उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥४॥ तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न नाहीं माझा ॥५॥