भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां वैष्णवांचा । नेम काया मने वाचा ॥१॥ धीर धरु जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु॥ उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥ तरीच हरीदास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥१॥ देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही असों निंश्चितीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम