भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां शरणागतां । एवढी काय करणें चिंता

amhan sharanagatan | evadhi kay karanen chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥ परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥ अभयदान वदें । आम्हां कैंचीं द्वंदें ॥२॥ तुका म्हणे आम्ही । हरीजन साधनाचे स्वामी ॥३॥