भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागतचि बळ

satya satyen deten phal | nahin lagatachi bal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागतचि बळ ॥१॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥ करावी च चिंता। नाहीं लागती तत्वता ॥२॥ तुका म्हणे भावें । होते सकळ बरवें ॥३॥