भजनी मालिका
← भजनांकडे परत

संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे

sandeh badhak apaapanayanten | rajjusarpavat bhasatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥ आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां । शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥ पापपुण्य कैसे भांजिले अंक । दशकाचा एक उरविला । जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥ दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा । धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥