भजनी मालिका
← भजनांकडे परत

संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं

sandeh nirase tari ruchikar | phikyasi adar chavi nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥ आतां नको मज खोटयानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥ तुका म्हणे कशी निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥