भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि

satya athavitan dev | jato bhenv paloni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥ न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥ तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेमे सर्वांसी ॥३॥