भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें

satya sach kharen | nam vithobachen baren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥ जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥ तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥