भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी

satya amhan manin | navhon gabalache dhani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥