भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥ भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥ काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे सांठविले॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥ माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥ तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम