भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना

atan mi deva pangharon kai | bhikechen ten hi ure chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥२॥ तुका म्हणे जना वेगळें झालें । एक चि नेलें एकल्याचें ॥३॥