भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची

atan bhay nahin aisen vate jiva | ghadaliya seva samarthachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥ येथें नाहीं जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥ तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥