भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं

atan majhe naka vanun gun dosh | kariton upadesh yacha kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥ तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥