भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे

atan majhe sakhe yeti varakari | jiva as thori lagalise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु॥ काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे सांठविले॥२॥ मागणे ते काय धाडिले भातुके । पुसेन ते सुख आहेतसीं ॥३॥ तुका म्हणे काय सांगती ते कानीं । ऐकोनिया मनीं धरुनी राहे ॥४॥