भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा

atan mi patit aisa sach bhaven | kalon anubhaven alen deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥ येर येरा दृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥२॥ तुका म्हणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुम्हां ॥३॥