भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी

atan yenen padipaden | ras sevun ha nivaden | mungi neli goden | theviliye adachani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥ तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥ भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥ काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥