भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम