भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती

muktipang nahin vishnuchiya dasan | sansar to kaisa na dekhati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥२॥ बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविलें ॥३॥ दयावंत तरी देवाचि सारखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥ तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥