भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम

mukhin viththalachen nam | mag kaicha bhavabhram

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥ सुखें असों संसारीं । मग जवळी च हरी ॥२॥ मुक्तिवरील भक्ती जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥ मग देवभक्त झाला । तुका तुकीं उतरला ॥४॥