भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां

mi yachak tun data | kay satya pahon atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥ म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥ आह्मी घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥ तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥