भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें

mukta kasaya mhanaven | bandhan ten nahin thaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥ देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥ तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥