भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखाकडे वास । पाहें करूनियां आस

mukhakade vas | pahen karuniyan as

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥ आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥ तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥ तुका म्हणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥