भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचेतें वदवी रसनेतें चाखती । नेत्रातें दाखवी परि त्या दुरी

vacheten vadavi rasaneten chakhati | netraten dakhavi pari tya duri

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वाचेतें वदवी रसनेतें चाखती । नेत्रातें दाखवी परि त्या दुरी ॥१॥ बुध्दी बोधविता चित्ता चेतविता । देहीं देहातीता कैसेनि दावूं ॥२॥ भावाभावातीत अव्दैता अव्दैत । ज्यातें म्हणत नेति नेति ॥३॥ निळा म्हणे कांही न होऊनियां जें आहे । दाविती त्याचि सोय सद्गुरु संत ॥४॥