भजनी मालिका
← भजनांकडे परत

विजयध्वज उभारला । तुमचा मिरवला तिहीं लोकीं

vijayadhvaj ubharala | tumacha miravala tihin lokin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विजयध्वज उभारला । तुमचा मिरवला तिहीं लोकीं ॥१॥ करितां दासाचें धांवणे । एकाचि स्मरणें नामाच्या ॥२॥ संतहि बडिवार वर्णिती । हाचि श्रीपती नित्यानीं ॥३॥ निळा म्हणे ऐकोनि वचनें । धरिला मनें विश्वास ॥४॥