भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥ हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मंने । मग म्हणे हें सध्यास्नानें । काहींची न करिती गोंवळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मन माझें बैसलें ध्यानीं । तुमचे चिंतनीं नामाचिये ॥१॥ ऐक्यासनिं स्थिरावलें । आठवी पाऊलें निरंतरत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मनींचा माझिया वो संदेह फिटला । देव पाहों जातां जवळींच भेटला । अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला । जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो ॥१॥ पुरलें जीवींचे आर्त साजणी । पाहें जेथें तेथें दिसे चक्रपाणी । लोकलोकांतरी त्याचीचि भरणी । भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महर्षी देव स्तविती ज्यातें । कृतांजुळी हातें जोडूनियां ॥१॥ तो हा उभा विटेवरी । रम्य तीरीं चंद्रभागे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥ मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥ ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महिमा अदभूतची पाहतां । चरणीं उध्दार झाला पतिता ॥१॥ आहिल्या शिळा झाली शापें । चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महिमा याचा चतुर्मुखा । न करवेचि लेखा वर्णितां ॥१॥ सनकादिकाहि नित्य येती । पूजा करिती देवभक्ता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥ नामचि तुमचें पुरे देवा । न करुं हेवा आणिक ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मागें उदंड साधनें केलीं । उत्तीर्ण तीं झालीं कर्मफळें ॥१॥ परि तुमचें नेदितीच प्रेम । वाढविती श्रम संसारींचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मागें ऐकिले पवाडे याचे । आजीं ते साचे कळों आले ॥१॥ आपुलियाचि स्वानुभवा । आलें तेव्हां साच कळलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा