भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन विश्रांति पावलें । गुरुचरणीं स्थिरावलें

man vishranti pavalen | gurucharanin sthiravalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मन विश्रांति पावलें । गुरुचरणीं स्थिरावलें ॥१॥ ज्ञानयुक्त होतां मन । ब्रम्हभूत झालें जाण ॥२॥ जिकडे जिकडे जाय मन । तिकडे तिकडे अधिष्ठान ॥३॥ निळा म्हणे मन । होऊनि ठेलें तें उन्मन ॥४॥