भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हदयांत

magen pudhen avagha hari | gharin darin hadayant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हदयांत ॥१॥ याविण रितें न दिसे कोठें । सानें मोठें अणु रेणु ॥२॥ गगन दिशा महितळी । माजि पोकळीं तोचि तों ॥३॥ निळा म्हणे मनाबुध्दी । माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥