भजनी मालिका
← भजनांकडे परत

महिमा याचा चतुर्मुखा । न करवेचि लेखा वर्णितां

mahima yacha chaturmukha | na karavechi lekha varnitan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
महिमा याचा चतुर्मुखा । न करवेचि लेखा वर्णितां ॥१॥ सनकादिकाहि नित्य येती । पूजा करिती देवभक्ता ॥२॥ सुरवर आणि मुनिजन । संतसज्जन नित्य स्तविती ॥३॥ निळा म्हणे सकळही तीथें । होतीं कृतार्थ दर्शनें ॥४॥