भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें उदंड जोडी केली । कोठें आली सांगातें

magen udand jodi keli | kothen ali sangaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मागें उदंड जोडी केली । कोठें आली सांगातें ॥१॥ आतां पुरे नाम वाचें । सार्थकाचें कारण ॥२॥ कोठे जाऊं खाऊं फेरे । मतांतरें अनेकें ॥३॥ आतां पुरे नाम वाचे । सार्थकाचें कारण ॥४॥ कोठें जाऊं खाऊं फेरे । मतांतरें अनेक ॥५॥ निळा म्हणे नारायणा । भाव जाण अंतरींचा ॥६॥