भजनी मालिका
← भजनांकडे परत

मस्तक माझा पायांवरी । राहो निरंतरी संतांच्या

mastak majha payanvari | raho nirantari santanchya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मस्तक माझा पायांवरी । राहो निरंतरी संतांच्या ॥१॥ इतुलेन मी कृतकृत्य । होईन निश्चित संसारीं ॥२॥ धरिल्या जन्माचें सार्थक । भवभयमोचक साधन हें ॥३॥ निळा म्हणे नलगे फार । करणें विचार यावरी ॥४॥