भजनी मालिका
← भजनांकडे परत

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही

madhyen paramatma shrihari | dadhiodan gheuni karin | kaval tyanchiyen mukhon bhari | ani svikari apanahi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥ हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मंने । मग म्हणे हें सध्यास्नानें । काहींची न करिती गोंवळ ॥२॥ आम्ही याचें शेष घेणें । तैं ब्रम्हत्वा मुकणें । यज्ञी अग्रपूजेचें आवंतणें । कैंचे येईल मग आम्हां ॥३॥ यातें नाही यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र । आम्ही सोवळे निरंतर । करुं उच्चारु वेदाचा ॥४॥ सोंवळें ओेंवळे नाही यांसी । केलें अपोषण्‍ कर्मासी । सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥ प्रायश्चितेंही घेतां । न फिटे विटाळ तत्वतां । ऐसें विचारुनियां विधाता । पालटी तत्वतां ब्रम्हपण ॥६॥ निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बाधी त्या नांव माया । मग तो रुप पालटूनियां । झाला गोंवळ वेषधारी ॥७॥